Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड; लाईट बिल न भरल्याने अग्निशामक विभाग अडचणीत

 महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड; लाईट बिल न भरल्याने अग्निशामक विभाग अडचणीत

 सिडको नितीन चव्हाण 



शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असलेल्या अग्निशामक विभागाकडे नाशिक महानगरपालिका गंभीरपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत सर्वप्रथम धावून जाणारे अग्निशामक दलच आज महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे अडचणीत सापडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महानगरपालिकेने गेल्या तीन महिन्यांपासून अग्निशामक विभागाच्या वीज बिलाचा भरणा केलेला नाही. परिणामी आज वीज बिल न भरल्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अग्निशामक केंद्रातील अत्यावश्यक यंत्रणा, संपर्क व्यवस्था व इतर उपकरणे वीजेवर अवलंबून असताना अशा प्रकारची निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा असल्याचा आरोप केला जात आहे.

आग लागणे, अपघात, गॅस गळती अशा घटनांमध्ये वेळेवर प्रतिसाद देणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र वीज पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अडचणींमुळे आपत्कालीन सेवांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने तात्काळ थकीत वीज बिलाचा भरणा करून अग्निशामक विभागाला सुरळीत सेवा देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.