बापरे पंधरा वर्षात निधी असताना कोणीच आले नाही.... नेमक निधी नसताना काम करणारा नेता आहे तरी कोण... नागरिकांमध्ये चर्चा
सिडको/नितिन चव्हाण
गेल्या पंधरा वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी अनेक प्रतिनिधींना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. परंतु, प्रतिनिधींनी मिळालेल्या संधीचे सोनं करायचे की त्याची राख करायची, हे नेहमीच त्यांच्या हातात असते. नागरिकांनी सातत्याने दाखवलेला विश्वास आणि संयम अनेकदा व्यर्थ गेला, कारण विकासकामे केवळ कागदावरच मर्यादित राहत होती.
या निराशेतून मार्ग काढत, स्थानिक नागरिकांनी अखेर तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि प्रविण (बंटी) तिदमे यांना संधी दिली. नागरिकांच्या अपेक्षांचा भार जाणून तिदमे यांनी कामांना गती दिली आणि प्रभागातील विकासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. नागरिकांनी पंधरा वर्षांत न पाहिलेला विकास फक्त काही वर्षांत होताना दिसला, आणि त्यामुळे तिदमे यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरू झाली.
महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले
प्रभागातील महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या उपक्रमामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आले असून नागरिकांकडून याचे स्वागत करण्यात आले आहे.
पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न सोडवण्याकडे मोठे पाऊल
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. पाईपलाईन दुरुस्ती, नवीन जोडण्या आणि तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना सुयोग्य पाणीपुरवठा देण्यात आला.
पावसाळ्यात खड्ड्यांनी त्रस्त नागरिकांना दिलासा
दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे त्रस्त होणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा देत अनेक मुख्य आणि उपरस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले.
योगा हॉल, सभामंडप आणि पेवर ब्लॉकचे उत्तम नियोजन
आरोग्य आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी योगा हॉल, विविध कार्यक्रमांसाठी सभामंडप, तसेच सर्व प्रमुख चौकांत पेवर ब्लॉक बसवून सौंदर्यीकरणासह सुविधा तयार करण्यात आल्या.
टवाळखोरांवर नियंत्रण—प्रत्येक चौकात हायमास्ट
रात्रीच्या वेळेला अंधाराचा फायदा घेणाऱ्या टवाळखोरांवर अंकुश आणण्यासाठी सर्व महत्त्वाच्या चौकांत हायमास्ट लाइट्स बसविण्यात आल्या. यातून प्रभागात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
भुयारी गटार आणि ड्रेनेज लाईनचे मोठे काम पूर्ण
प्रभागातील सर्वात मोठी समस्या असलेले गटार व ड्रेनेज लाईनचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. अनेक ठिकाणी नवीन लाईन टाकण्यात आल्या तर जुन्या अडथळ्यांची दुरुस्ती केली गेली.
निधी नसतानाही कामे मंजूर — आणि दुसऱ्या दिवशीच सुरू
या सर्व विकासकामांपैकी अनेक कामे निधी नसतानाही मंजूर करून आणणे, संबंधित विभागांकडून तातडीने मान्यता मिळवणे आणि कोणताही विलंब न लावता काम त्वरित सुरू करणे, ही तिदमे यांची कार्यपद्धती नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरली.
“ज्या ठिकाणी कुदळ मारली, त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी काम सुरू झाले,” असा नागरिकांचा अनुभव आहे.
नेतृत्वाची ओळख — उपलब्धता हा सर्वात मोठा गुण
नागरिकांचे प्रश्न तत्काळ ऐकून त्यावर उपाय शोधणे, कोणत्याही वेळी फोनवर उपलब्ध राहणे आणि प्रत्येक तक्रारीवर त्वरित कारवाई करणे हा प्रविण (बंटी) तिदमे यांचा सर्वात मोठा गुण असल्याचे नागरिक सांगतात...
