नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २९ मधून नवा चेहरा चर्चेत
सिडको /नितिन चव्हाण
तरुण व तडफदार सरपंच अजिंक्य शिवाजीराव चुंबळे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता
नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवकांची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक प्रभागात हालचालींना वेग आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्याने आणि प्रशासकीय राजवट लागू असल्याने नागरिकांमध्ये आता परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २९ मधून नवा, तरुण व तडफदार चेहरा म्हणून सरपंच अजिंक्य शिवाजीराव चुंबळे यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. अजिंक्य चुंबळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजिंक्य शिवाजीराव चुंबळे हे यापूर्वीपासूनच राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांना स्थानिक राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे. सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे एक कार्यक्षम, काम करणारा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
तरुणाईचा उत्साह, प्रशासकीय अनुभव आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांच्या जोरावर अजिंक्य चुंबळे हे प्रभाग २९ मधील मतदारांना एक सक्षम पर्याय ठरू शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषतः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर नवा चेहरा प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अजिंक्य चुंबळे यांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी त्यांच्या नावाची चर्चा आणि सोशल मीडियावरील हालचाली पाहता येत्या काळात प्रभाग २९ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात आणि कोणत्या पक्षाकडून अथवा अपक्ष म्हणून मैदानात उतरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
