हॅलो नाशिक संपर्क पुस्तिकेचे भव्य प्रकाशन संपन्न
नाशिककरांसाठी सर्व महत्त्वाचे संपर्क क्रमांक एकाच ठिकाणी उपलब्ध
सिडको/नितिन चव्हाण
प्रभाग २४ मधील नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘हॅलो नाशिक – महत्त्वाचे संपर्क क्रमांक’ या संपर्क पुस्तिकेचे भव्य प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. उपयुक्त माहितीने समृद्ध असलेल्या या पुस्तिकेमध्ये नागरिकांच्या दैनंदिन गरजा, आपत्कालीन परिस्थिती तसेच शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेले सर्व संपर्क क्रमांक एकत्रितरित्या देण्यात आले आहेत...
इच्छुक उमेदवारांची प्रभाग 24 मध्ये जोरदार चर्चा
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर
प्रभाग क्रमांक २४ मध्ये अक्षदा स्वप्निल पांगरे व सागर मोटकरी हे घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत दिनदर्शिका व परिचय पत्रक हे घरोघरी देऊन नागरिकांचे आशीर्वाद घेत आहेत... त्यामुळे प्रभाग 24 मध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे
उपक्रमाची संकल्पना – प्रविण (बंटी) तिदमे यांचे पुढाकारातून निर्मिती
या पुस्तिकेची संकल्पना व मार्गदर्शन शिवसेना नाशिक महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केले. प्रभागातील नागरिकांसाठी सर्व आवश्यक संपर्क माहिती एका ठिकाणी उपलब्ध असावी, नागरिकांना विविध ठिकाणी भटकंती करावी लागू नये, तसेच तातडीच्या परिस्थितीत वेळ वाचून त्वरित मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
पुस्तिकेची वैशिष्ट्ये
या पुस्तिकेमध्ये खालील संपर्क माहिती व्यवस्थित विभागानुसार समाविष्ट करण्यात आली आहे –
• महापालिका विभागांचे संपर्क क्रमांक
• स्थानिक पोलीस ठाणे, आपत्कालीन सेवा, अग्निशमन
• रुग्णालये, अॅम्ब्युलन्स सेवा, रक्तपेढ्या
• वीज, पाणी, ड्रेनेज संबंधित तक्रार निवारण विभाग
• प्रभागातील लोकप्रतिनिधी व महत्त्वाची कार्यालये
• सिडको विभागातील विविध सुविधा केंद्रांचे संपर्क
• शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, हेल्पलाइन क्रमांक
या सर्व माहितीचा नागरिकांना त्वरित उपयोग व्हावा, यासाठी पुस्तिका सोप्या भाषेत आणि सुटसुटीत मांडणीमध्ये तयार करण्यात आली आहे.
नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग २४ मधील नागरिकांना ही पुस्तिका मोफत वितरित केली जात असून, अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. “इतकी माहिती एकाच ठिकाणी मिळाली नसती तर अनेकदा योग्य व्यक्ती किंवा विभाग शोधण्यात वेळ जायचा. आता एका पुस्तकात सर्व क्रमांक असल्याने कामे अधिक सोपी झाली आहेत,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळाली.
उपक्रमाचे कौतुक
प्रकाशन सोहळ्यात मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी सांगितले की,
“प्रभागातील नागरिकांसाठी अशा उपयुक्त माहितीची पुस्तिका तयार करणे हा प्रशंसनीय उपक्रम आहे. हे काम जनसेवा भावनेने केले असून, इतर प्रभागांमध्येही असे उपक्रम राबवले जावेत.”कार्यक्रमात अनेक मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, समाजसेवक व नागरिक उपस्थित होते.
‘हॅलो नाशिक’ संपर्क पुस्तिकेमुळे नागरिकांना शासन व विविध विभागांशी संपर्क साधणे आता अधिक सोपे होणार असून ही पुस्तिका प्रत्यक्षात प्रभागातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

