नाशिक महापालिकेच्या जाचक अटींविरोधात प्रविण (बंटी) तिदमे यांचे निवेदन; उपायुक्तांकडे तात्काळ सुधारणा करण्याची मागणी
सिडको:, नितिन चव्हाण
नाशिक महानगरपालिकेने प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती स्वीकारताना मतदारांकडून अनावश्यक आणि बेकायदेशीर कागदपत्रांची सक्ती केल्याच्या निषेधार्थ शिवसेना नाशिकचे महानगरप्रमुख व माजी नगरसेवक प्रविण (बंटी) सावळीराम तिदमे यांनी आज महापालिकेच्या निवडणूक शाखेच्या उपायुक्तांना देऊन तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, हरकत अर्ज देणाऱ्या मतदारांकडून मतदान ओळखपत्राची प्रत, आधारकार्ड, वीज बिल आणि सर्वात जाचक अट म्हणून “ज्या प्रभागात नाव आहे त्या प्रभागाच्या मतदार यादीतील पानाची प्रत” अशी बंधनकारक मागणी केली जात आहे. या अटींमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, मतदाराचे अर्ज जवळच्या विभागीय कार्यालयात न स्वीकारता ज्या प्रभाग समितीच्या प्रभागात नाव समाविष्ट झाले, तेथील विभागीय कार्यालयातच अर्ज स्वीकारत आहेत. तिदमे यांनी स्पष्ट केले की राज्य निवडणूक आयोगाच्या आदेश क्र. स्था.स्व.नी/2023/प्र.क्र.31/निवि-30, दि. 16 जुलै 2025 नुसार सर्वच कागदपत्रबंधनकारक नाहीत. आदेशात पृष्ठ 5 व 6 वर पत्ताप्रमाणासाठी काही ऐच्छिक कागदपत्रे असून, एकच पुरावा पुरेसा असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे मनपाने नागरिकांवर लादलेल्या या अटी पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनात हेही अधोरेखित केले आहे की अनेक नागरिकांकडे अद्ययावत मतदान ओळखपत्र उपलब्ध नसताना त्यांचे अर्ज नाकारणे म्हणजे त्यांच्या मूलभूत मतदान हक्काचे उल्लंघन आहे. अनेक मतदारांना नवीन ओळखपत्रच मिळालेली नाहीत. चुकीच्या प्रभागात नावे समाविष्ट करण्याची जबाबदारी मनपाची असून त्याच चुकीची जबाबदारी आता नागरिकांवर ढकलली जात आहे, असा आरोप तिदमे यांनी केला.
प्रविण तिदमे यांनी उपायुक्तांकडे केलेल्या मागण्यांमध्ये जाचक कागदपत्रांची सक्ती रद्द करणे, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फक्त एक पत्ता पुरावा स्वीकारणे, इतर प्रभागाच्या यादीतील पानाची अट हटवणे आणि सर्व विभागीय कार्यालयांत हरकत अर्ज स्वीकारण्याची मुभा देणे यांचा समावेश आहे.
बातमीतील मुख्य मुद्दे:
