छत्रपती शिवाजी चौक, शांतीनगर येथे चंपाषष्ठी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नविन नाशिक:, नितिन चव्हाण
सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी चौक, शांतीनगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठीचा उत्सव भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडत आहे. खंडेराव महाराज मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तीमय वातावरण निर्माण होत असते विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी परिसर दुमदुमून जातो
चंपाषष्ठी निमित्त मंदिरात विशेष पूजा, अभिषेक, महाआरती यांचे आयोजन करण्यात येते. भाविकांची मोठी गर्दी होऊ लागते महिलांसह तरुणवर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत मंदिर परिसर गजबजून जातो
दरवर्षीप्रमाणे या मंडळाच्या वतीने भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी श्रद्धा व भक्तीभावाने महाप्रसादाचा लाभ घ्यावा सकाळपासून उशिरापर्यंत भाविकांची सतत वर्दळ सुरू असते मंडळाच्या स्वयंसेवकांनी गर्दी नियंत्रण, प्रसाद वितरण आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी उत्तम व्यवस्था केली आहे
दिमाखदार मिरवणूक. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगांच्या तालावर आणि ‘हर हर खंडेराया… जय जय खंडेराया’च्या जयघोषात मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात येते.
पारंपरिक वेशभूषेतील मान्यवर, घटस्थापना रथ, देवतांच्या प्रतिमा आणि विविध सांस्कृतिक झांज-पथकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले जाते
सामाजिक बांधिलकी जपत या वर्षी मंडळाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत नेत्र तपासणी करून आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे की चंपाषष्ठी उत्सवाचे महत्त्व जपत भक्तीभावाने उत्सवात सहभागी व्हावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आयोजक मंडळींच्या उत्तम व्यवस्थापनामुळे संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असून परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
