प्रभाग २४ मध्ये विकासाचा धडाका; निवडणूक बिगुलानंतर इच्छुकांची धावपळ वाढली
नाशिक प्रतिनिधी :,नितिन चव्हाण
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच नाशिक शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक दिवस प्रभागात न फिरणारे तसेच नागरिकांपासून दूर गेलेले अनेक माझी नगरसेवक आणि नवे इच्छुक आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. काहींनी मंदिरात स्वतःच्या नावाचे कंदील लावणे, तर काहींनी दिवाळीमध्ये पणत्या वाटून लोकसंपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर बॅनरबाजी, पोस्टर, शुभेच्छा संदेशांचा वर्षाव या माध्यमातूनही अनेक इच्छुकांनी स्वतःची उपस्थिती दाखवण्यास सुरुवात केली आहे.
-------------------
प्रशासकीय राजवटीतही प्रभाग २४ मध्ये थांबला नाही विकास
या साऱ्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विकासकामांची गती कायम ठेवणारे शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असतानाही रस्ते, जलवाहिनी, भुयारी गटार, पिवर ब्लॉक, सभा मंडप, सीसीटीव्ही कॅमेरे अशा अनेक कामांचा धडाका या प्रभागात सुरूच राहिला.
"निवडणुका लागो अथवा न लागो… विकासाचा रथ थांबता कामा नये" — या भूमिकेवर तिदमे ठाम राहिल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
------------------------------
इच्छुकांना प्रभागाची माहिती कमी, पण उपस्थिती मात्र जास्त
प्रभागात राबवण्यात आलेल्या मोठ्या कामांदरम्यान अनेक इच्छुक अचानक सक्रिय झाले. काहींना प्रभाग क्रमांक २४ चा भूगोलदेखील पूर्ण माहिती नसतानाही ते जलकुंभाच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेले आणि सोशल मीडियावर स्वतःचे पोस्टर, फोटो टाकून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. या बॅनरबाजीवर स्थानिकांमध्ये कुजबुज सुर
----------------------------------
२० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ — भव्य उद्घाटन सोहळा
प्रभागातील कोणत्याही नागरिकाला बाजूला न करता, सर्वांना सोबत घेतच २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभावर भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. प्रभागाची गरज ओळखून तिदमे यांनी मोठे पाणी प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
---------------------=-----
सिडकोतील खड्डेमय रस्त्यांना मिळाला दिलासा
सिडको परिसरात अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यांवर डांबराचे ठिगळही पडत नव्हते. मात्र नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता तिदमे यांनी महाराणा प्रताप चौक ते डेक्कन पेट्रोल पंप हा उत्कृष्ट दर्जाचा व्हाईट टॉपिंग रस्ता पूर्ण करून दिला. या रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.
------------------------------
नवा रस्ता लवकरच सुरू — नागरिकांमध्ये समाधान
तसेच प्रकाश पेट्रोल पंप ते पिंपरीकर हॉस्पिटल हा महत्त्वाचा रस्ता लवकरच सुरू होणार असल्याची माहिती प्रविण तिदमे यांनी दिली. प्रभागातील इतर अनेक लहान-मोठ्या कामांनाही प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितल-
------------------------
प्रभाग २४ मध्ये ‘काम’ विरुद्ध ‘दिखावा’
निवडणुकीचे वातावरण तापू लागले असतानाच अनेक इच्छुक केवळ बॅनर, फोटो, शुभेच्छा, भेटवस्तू वाटपात व्यस्त दिसत आहेत. दुसरीकडे प्रत्यक्ष आणि सातत्याने काम करणाऱ्या प्रविण (बंटी) तिदमे यांच्या कार्यपद्धतीची चर्चा प्रभागात तसेच संपूर्ण सिडको परिसरात वाढली आहे.
