वॉटर ग्रेस कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष; सत्ताधारी पक्षाच्या झेरॉक्स नगरसेवकावर साडेचार लाख घेण्याचा आरोप
प्रतिनिधी.. नितिन चव्हाण
वॉटर ग्रेस कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून साडेचार लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप सिडकोतील सत्ताधारी पक्षाच्या एका झेरॉक्स नगरसेवकावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, महापालिकेतील नोकरीसाठी पैसे घेणारा तो नगरसेवक नेमका कोण, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
पीडित कार्यकर्त्यांनी या संदर्भात पोलिस आयुक्तालयात औपचारिक अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती दिली. या व्यवहारात आणखी कोणते लोकप्रतिनिधी किंवा मध्यस्थ सामील आहेत का, याबाबतही संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
