जॉगिंग ट्रॅक मुख्य रस्त्यालगत
बॉम्ब सदृश्य वस्तूची अफवाच....!
गोविंद नगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक लगत मुख्य रस्त्यावर कोणी अज्ञात इसमाने एका थर्मोकॉल च्या बॉक्स मध्ये काही वस्तू ठेवून इथून निघून गेल्याची माहिती अंबड पोलिसांना कळताच या बॉक्स मध्ये काही स्फोटक असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ खबरदारी घेत बॉम्ब शोध पथकास पचारन केले.मात्र तपासा अंती यात काहीही भेटून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोविंद नगर च्या मुख्य रस्त्यावर कोणी अज्ञात इसमाने एका थर्मकोल च्या बॉक्स मध्ये काही इलेक्ट्रिकल वस्तू टाकून दिल्या असून यात बॉम्ब असू शकतो असे सांगितल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेद्रसिंग राजपूत हे
आपल्या सहकार्यांसमवेत अवघ्या काही मिनिटात पोहचले.
मुख्य रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावरील वाहतूकीचा अंदाज घेऊन व रहिवासीयांच्या सुरक्षतेची जबाबदारी आपल्यावरच असून लागलीच भुजबळ फार्म येथील बोगद्याकडून रस्ता बंद करून एकेरी वाहतूक सुरु केली. घटना स्थळी एकही सर्वसामान्य माणसांना जाण्यास मज्जाव करण्यात आला.
यावेळी तात्काळ बॉम्ब शोध पथकास पाचारन करत बॉक्स ची तपासणी केली असता या बॉक्स मध्ये लग्न सराईत अथवा वाढदिवसास फोडण्यात येणारे रंगीबेरंगी फटाके असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
