कर्मयोगी नगरमध्ये २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभावर भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न!
प्रविण( बंटी) तिदमे, कल्पना (ताई) चुं
भळे व राजेंद्र (भाऊ)महाले यांच्या प्रयत्नांनी जलकुंभाचे लोकार्पण
नाशिक । प्रतिनिधी..
नितिन चव्हाण
प्रभाग क्र. २४ मधील कर्मयोगी नगर परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणीटंचाईचा प्रश्न अखेर सुटला आहे. तब्बल २० लाख लिटर क्षमतेच्या नव्या जलकुंभाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या जलकुंभामुळे मागील अनेक वर्षांपासून पाणीअभावी त्रस्त असलेल्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन स्थानिक नगरसेवक तसेच शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख आणि मनपा स्थायी समिती सदस्य प्रविण (बंटी) तिदमे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ. कल्पना ताई चुंभळे, नगरसेवक राजेंद्र (भाऊ) महाले, तसेच स्थानिक नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जलकुंभाच्या निर्मितीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. प्रभागातील नागरिकांनी वारंवार पाणीटंचाईचा प्रश्न मांडला होता. नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करत मनपा प्रशासनाशी चर्चा केली. अखेर नगरसेवक निधीतून हा २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ पूर्ण करण्यात आला.
या कामामुळे कालिका पार्क, गोविंद नगर, बाजीराव नगर, सदगुरू नगर, जगताप नगर, तिडके नगर, खांडे मळा आणि कर्मयोगी नगर परिसरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाच्या वेळी प्रविण (बंटी) तिदमे यांनी सांगितले की, “या जलकुंभामुळे परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. नागरिकांनी दाखवलेल्या संयमामुळेच आज हे यश मिळाले आहे. पुढील काळातही परिसरातील विकासकामे प्राधान्याने राबवली जातील.”
दरम्यान, या सोहळ्यानंतर काही राजकीय इच्छुकांनी जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. मात्र नागरिकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करून खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
या जलकुंभावरच्या कामामुळे प्रभाग क्र. २४ मध्ये नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या बाबतीत दिलासा मिळणार असून, भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजाही पूर्ण होऊ शकतील. स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांचे आभार मानले.. तसेच कल्पनाताई चुंबळे व राजेंद्र महाले यांचे आभार मानले...
