प्रभाग २४ मध्ये भूमिपूजन सोहळा : काँक्रिटीकरण रस्त्याला लवकर सुरूवात
प्रतिनिधी:, नितिन चव्हाण सिडको
प्रभाग क्र. २४ मधील नागरिकांची दीर्घकाळची अपेक्षा पूर्ण होत असून, नवीन सिडको येथील हनुमान चौक (मंदिर) ते अग्रवाल तेल सेंटरपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन शनिवारी, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता संपन्न होणार आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सहकार्यातून मार्ग मोकळा झाला आहे प्रभागातील मा. नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे यश असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
नवीन सिडको परिसरात वाढती लोकसंख्या, दैनंदिन वाहतूक आणि पावसाळ्यातील दयनीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता या रस्त्याचे काँक्रिटीकरण अत्यावश्यक झाले होते. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर शेवटी मंजुरी मिळाली असून आता कामाला वेग येणार आहे. काँक्रिट रस्ता झाल्यानंतर परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
भूमिपूजन सोहळा हनुमान चौक (मंदिर), महाराणा प्रताप चौक, नवीन सिडको, नाशिक येथे पार पडणार असून स्थानिक नागरिक, तसेच ज्येष्ठ नागरिक महिला बचतगट, तरुण मंडळे तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
नवीन सिडको परिसरातील हा रस्ता विकसित झाल्यानंतर प्रभागातील स्वच्छता, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होणार असल्याचा आशावाद नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे..
