मुंबईतील उपोषणाला सिडकोतून पाठिंबा मराठा बांधवांसाठी अन्नसामग्री रवाना
सिडको :, नितिन चव्हाण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून विविध जिल्ह्यांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यांना आवश्यक ते सहकार्य मिळावे, कोणीही उपाशी राहू नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधव देखील पुढाकार घेत आहेत.
नवीन नाशिक येथील सकल मराठा समाज नाशिक यांच्या वतीने सोमवारी (१ सप्टेंबर) रोजी उपोषण स्थळी जाणाऱ्या समाज बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नसामग्रीची व्यवस्था करण्यात आली. यावेळी ५ हजार चपात्या, ठेचा, चटणी तसेच ५ हजार पाण्याच्या बाटल्या मुंबईसाठी पाठविण्यात आल्या. या अन्नसामग्रीची व्यवस्था नवीन नाशिकमधील शिवनेरी फॉर्म, त्रिमूर्ती चौक येथून करण्यात आली. पुढील काही दिवसांत अजूनही मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि साहित्य मुंबईकडे रवाना करण्यात येईल, असे समाज पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहभाग घेतला. त्यामध्ये आशिष हिरे, विजय पाटील, बाळासाहेब गीते, गणेश अरिंगळे, संजय भामरे, उमेश चव्हाण, सागर पाटील, श्याम कोठावळे, शुभम महाले, महेंद्र बेहेरे, सुनिल आहिरे, श्याम पाटील, रवी गाडे, अमोल पाटील, राम पाटील, योगेश शेजवळ, रेखा जाधव, प्रकाश बच्छाव, पोपट पाटील, महेंद्र पाटील, गणेश पाटील, मामा लोंढे आदींचा समावेश होता.
तसेच समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये नानासाहेब महाले, वंदना ताई पाटील, दत्ता काका पाटील, दादा कापडणीस, राजेश कदम, अविनाश सूर्यवंशी, किशोर शिंदे यांच्यासह नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार योगेश गांगुर्डे यांनी मानले.
