श्री कृष्ण मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला
शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांत समाधानाची लाट
प्रतिनिधी नितीन चव्हाण
प्रभाग क्रमांक २४ मधील गर्दीचा व दळणवळणाचा मुख्य भाग असलेल्या श्री कृष्ण मंदिर चौक परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच थाटात पार पडला. या विकासकामासाठी शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला मंजुरी मिळाली आहे.
या कामाच्या मंजुरीसाठी मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांचे विशेष सहकार्य लाभले. या तिघांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नांतून श्री कृष्ण मंदिर चौक परिसराचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.
भूमिपूजन प्रसंगी अनेक मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना प्रविण (बंटी) तिदमे यांनी सांगितले की, "श्री कृष्ण मंदिर चौक परिसरातील रस्ता हा नेहमी वाहतूक कोंडीचा आणि खराब रस्त्याचा मुद्दा बनत होता. अनेक वेळा अपघातांचीही शक्यता निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे आणि वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली होती. आज या कामाच्या सुरुवातीने जनतेला दिलासा मिळेल."
स्थानिक नागरिकांनी या विकासकामाचे स्वागत करत, प्रविण तिदमे यांचे आणि शिवसेना नेतृत्वाचे आभार मानले. या कामामुळे परिसरातील वाहतूक सुकर होणार असून, नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
श्री कृष्ण मंदिर चौक हे शहरातील एक महत्त्वाचे व व्यापारी दृष्टिकोनातून गजबजलेले ठिकाण असल्याने येथील काँक्रिटीकरण काम पूर्ण झाल्यानंतर सिडकोवासीय तसेच स्थानिक रहिवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्त्याचा लाभ होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
