Nashik:, महापालिकेच्या कामगारांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्र्यांना निवेदन
नाशिक नितिन चव्हाण:,
नाशिक महानगर पालिकेच्या कामगारांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याकरिता भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस रम्मी राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठ मंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना निवेदन दिले.
या निवेदनात कामगारांच्या मागण्यांबाबत असे नमूद करण्यात आले आहे कि,कामगारांच्या स्वतच्या घरांसाठी महानगर पालिकेकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले नाही, महानगर पालिकेच्या सर्व कामगारांना हक्काचे आणि स्वतःचे अल्पदरात घर मिळावे. कामगारांच्या कलागुण विकास आणि कामगार कल्याण योजना राबविण्यात याव्यात. त्यामुळे कामगारांचा मानसिक विकास होईल आणि कर्मचार्याचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. महापालिकेतील सुमारे ३ हजार ६०९ रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी. वर्ग तीन आणि चार कर्मचार्याची पदोन्नती रखडलेल्या आहेत. त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दहा वीस आणि तीस वर्षांनी देय असलेल्या बरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ सर्व कर्मचार्यांना त्वरित मिळवा. कार्यालयातील कामगारांना स्टेशनरी आणि फर्निचर संगणक स्वतःच्या खर्चाने आणुन कामे करावी लागतात ही चुकीची पद्धत बंद करण्यात यावी. या सर्व प्रश्नावर त्वरित कारवाई करण्याची सूचना नाशिक महानगरपालिकेला देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी हनुमंत लांडगे, अजयप्रकाश दुबे,बाळासाहेब टेमकर, अविनाश रामिष्टे,विजय पवार, अॅड भुषण पाटिल,जगन्नाथ गावडे उपस्थित होते.
