जुने सिडकोत उद्यापासून पर्यावरण व्याख्यानमाला...
महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांच्या हस्ते उद्घाटन
सिडको:, नितिन चव्हाण
अर्जुन प्रभात शाखा जुने सिडको व गुरुजी शाखेच्या वतीने सिडकोतील बडदे हॉल या ठिकाणी पर्यावरण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती मधुकर पाटील व सावळीराम तिदमे यांनी यावेळी दिली आहे.
पर्यावरण व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे नाशिक आकाशवाणीच्या निवेदिका मेघा बुरकुले या पहिले पुष्पगुणार आहेत तसेच माणूस आणि पर्यावरण हा व्याख्यानाचा विषय असणार आहे.
बुधवार दिनांक ४ जून रोजी सकाळी ७. ३० वाजता मा नगरसेवक तथा शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती व्याख्यानमालेच्या आयोजकांनी दिली.
योगाचार्य कृष्णाराव बेदडे यावेळी अध्यक्ष स्थान भूषवणार आहे.
सर आठवड्याला एक व्याख्या विषय फक्त पर्यावरण असणार आहे.
गेल्या वर्षी या पर्यावरण व्याख्यानमालेत विष व्याख्याने झाली पर्यावरण विषयक व्याख्यान देण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी... ८००७९७५७६० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे व्याख्यानमालेच्या आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
