Nashik, प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात
सिडको :, नितिन चव्हाण
नाशिक एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत करुन पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे यांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन औक्षण करुन शाळेत स्वागत केले.
मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके देण्यात आली.
त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि मुलांना दररोज शाळेत उपस्थित राहून अभ्यासाबरोबर शालेय शिस्तीचे पालन करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती बडगुजर यांनी तर आभार शिक्षक प्रतिनिधी सुनंदा साळुंके यांनी मानले.यावेळी नेहा बोडखे,भारती चौधरी, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर उपस्थित होते.
