आमदार सीमा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम!
सिडको नितिन चव्हाण
प्रभाग क्रमांक 31 मध्ये आमदार सौ. सीमा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. छावा क्रांतिवीर सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग आणि शिवसेना (शिंदे गट) सामाजिक कार्यकर्त्या पूजा शिवा तेलंग यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
"एक वृक्ष – हजारो श्वास" या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या उपक्रमात आ. सीमा हिरे यांनी स्वतः उपस्थित राहून सामाजिक बांधिलकीची जाणीव जागवली. यावेळी केक कापून वाढदिवसही आनंदात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शंभू नारायण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ तेलंग, भाजपच्या रश्मी हिरे, तसेच प्रभागातील शेकडो नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
हा उपक्रम वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला. उपक्रमासाठी आयोजक व सर्व सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
