Nashik :,सिडकोत युवकाचा पाठलाग करून खून करणारे संशयित दोन तासात अंबड पोलिसांच्या ताब्यात
सिडको नितीन चव्हाण :,
अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या दोन तासांत खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
२८ जून २०२५ रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास स्वामीनगर, समाज मंदिराजवळ प्रशांत सुभाष भदाणे (वय २५) याचा जुन्या वादातून धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या प्रकरणी सुफियान अनिस अत्तार (वय १८) आणि विक्की बंटी प्रसाद (वय २०) या दोघांविरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उप आयुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक आयुक्त श्री. शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर कड व गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेऊन सापळा रचत दोन्ही आरोपींना दोन तासांत अटक केली.
या कामगिरीत पोउनि नितीन फुलपगारे, सपोनि किरण रौंदळे, पो.नि. सचिन खौरनार व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत.
