योगसाधनेमुळे जीवन उन्नत बनते – योगाचार्य कृष्णराव बेदडे यांचे प्रतिपादन
सिडको प्रतिनिधी:,नितिन चव्हाण
सिडको नवे नाशिक येथील अर्जुन प्रभात, श्री गुरुजी शाखा आणि योग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जुने सिडको येथील बडदे हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात योगाभ्यास, प्राणायाम, सूर्यनमस्कार यासह मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित योगाचार्य कृष्णराव बेदडे यांनी सांगितले की, "योगसाधनेमुळे जीवन उन्नत बनते. आजच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तीस योगयुक्त जीवनशैलीची नितांत गरज आहे."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रचारक मदन कुलकर्णी होते. या वेळी सावळीराम तिदमे यांनीही आपले विचार मांडताना सांगितले की, "मन, बुद्धी आणि अंतःकरणात विकारग्रस्त जीवनशैलीचे प्रदूषण वाढल्यामुळे आज अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. यावर रामबाण उपाय म्हणजे नियमित योगसाधना आणि अध्यात्म चिंतन आहे."
कार्यक्रमाची सुरुवात योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराने झाली. या उपक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन मधुकर पाटील, पंडित पाटील आणि किसन शिंदे यांनी केले.
या प्रसंगी तुळशीराम खैरनार, सुनील लोखंडे, उदय पाटील, अविनाश चव्हाण, मथुरे, जाखडे आदी मान्यवर आणि स्वयंसेवक, योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूलाल अलई यांनी केले, तर आभारप्रदर्शन अनिल देवरे यांनी केले.
