Nashik:,पाहूना मुक्कामी आला सहा लाखाचे दागिने घेऊन पसार झाला...
नाशिक:, नितिन चव्हाण
शहरासह उपनगरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे... घरफोडी मोबाईल चोरी वाहन चोरी चैन स्नेकिंग असे प्रकार सध्या शहरात बघायला मिळत आहे.
असाच एक अजब गजब प्रकार म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.
किशोर गोविंद क्षिरसागर वय ४४ रा. किशोर सुर्यवंशी मार्ग वृंदावन नगर म्हसरूळ यांच्या घरी त्यांचे भाचेजावई जीवन तानाजी तलवारे वय वर्ष २६ रा.पेठ हे भेटण्यासाठी आले होते त्यानंतर अग्रस्तव मुक्कामी थांबले होते.
तलवारे हे किशोर क्षीरसागर यांच्या रूममध्ये रात्री झोपले.. रात्री सर्वजण झोपल्याचा फायदा घेत तलवारे यांनी बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील १ लाख रुपये रोख रक्कम ५ तोळे सोन्याचे दागिने मंगळसूत्र सोन्याची अंगठी असा ऐकुन ५ लाख९५ हजाराचा मुद्देमाल घेऊन पसार झाले...
गोविंद क्षीरसागर यांनी त्यांच्या बेड मध्ये असलेले कपाट चेक केले असता त्यांना दागिने व रोख रक्कम गायब झाल्याचे निदर्शनात आले त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरात आलेल्या पाहुण्यानेच रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले आहे.
क्षीरसागर यांनी तात्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली व झालेला संपूर्ण प्रकार सांगितला असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व किशोर क्षीरसागर यांच्या भाचे जावयाने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आरोपी फरार असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
