Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सिडकोत भर दिवसा दोन युवकांवर प्राणघातक हल्ला

Cidco Nashik:, सिडकोत भर दिवसा दोन युवकांवर प्राणघातक हल्ला....

सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात दोन युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडले आहे... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज बेडसे रोहित शेळके पवन शिगवण सर्व राहणार महाकाली चौक हे सकाळी कंपनीत कामाला जात होते...



 रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपल्याने त्रिमूर्ती चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून चार युवक आले. व त्यांनी शिवीगाळ करत कोयत्याने  हल्ला चढवला हातात लोखंडी रॉड चोपर कोयता घेऊन दोन युवकांना जबर मारहाण केली या मारहाणी मध्ये एका युवकाच्या डोक्याला पायाला व पोटाला तर दुसऱ्या युवकाच्या हाताला व पाठीला धारदार शस्त्राने वार केल्याने गंभीर दुखापत झाली आहे मारहाण करून संशयित फरार झाले आहेत  


या मारहाणी मध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.. भर दिवसा या युवकांवर हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.