पोलीस असल्याचे सांगत ५५ हजारांचे सोनं लंपास..
सिडको, नितिन चव्हाण
नाशिक शहरासह सिडको इंदिरानगर भागात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे गेल्या वीस ते पंचवीस दिवसात शहरासह उपनगरीय भागात खुणांच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.
तसेच चेंज मॅचिंग घरफोडी हाणामारी टवाळखोरांचा उद्रेक हा देखील दिसून येत आहे... यावर पोलिसांनी वेळीच आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे अशातच एक प्रकार
इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील कानिफनाथ चौक राजीव नगर या ठिकाणी पोलीस असल्याचे भासवत ५५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत बाळकृष्ण धोंगडे वय वर्ष ५४ हे सकाळी मॉर्निंग वॉक साठी पाय जात होते.. ते पायी जात असताना त्यांच्या मागून दोन अनोळखी इसम मोटरसायकल वरून आले व त्यांनी आम्ही पोलिस आहोत अशी तोतयागिरी करून चंद्रकांत धोंगडे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व एक पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेऊन चोरटे पाथर्डी फाटा च्या दिशेने पळून गेले चंद्रकांत धोंगडे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांच्यासोबत झालेला प्रकार पोलिसांना सांगितला व इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत पाहणी केली असता चोरटे फरार झालेले होते.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख करत आहेत..
