अंबड पोलिसांनी चोप देत ५० टवाळखोर घेतले ताब्यात
सिडको :,नितिन चव्हाण
नाशिक शहरात सह सिडको भागात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढायला सुरुवात केली आहे.... तसेच गेल्या पंधरा ते वीस दिवसात शहरात खुनांच्या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे.
या गुन्हेगारी वृत्तीच्या टवाळखोरांना खाकीचा चाप बसावा म्हणून याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे तसेच कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत ४०ते ५० टवाळखोरांना ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्यात आणले...
मद्यप्राशन करून रस्त्यावर धिंगाणा घालणे.. शिवीगाळ करणे उघड्यावर दारू पिणे मद्य पिऊन दादागिरी करणे अशा टवाळखोरांना अंबड पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत दांडुक्याचा प्रसाद देखील दिला..... या कारवाईने अंबड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे..
अंबड पोलिसांनी या टवाळखोरांचा बंदोबस्त करत नेहमी असाच पोलिसांचा दाख ठेवावा अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती
