सिडकोत तरुणावर प्रेम प्रकरणातून कोयत्याने हल्ला...
सिडको प्रतिनिधी:,
प्रेम किती वेडे असते याची प्रचिती सिडकोमध्ये आली. बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून भावासह त्याच्या पाच मित्रांनी तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार त्रिमूर्ती चौकातील एका शाळा परिसरात घडला.
पोलिसांनी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. जखमी तरुणाचा जबाब घेतला मात्र त्याने 'तिच्याकरता मरण पत्करेन पण तक्रार करणार नाही' असे सांगत तक्रार देण्यास नकार दिला.
पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी त्रिमूर्ती चौकातील एका शाळेजवळ सहा जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयता, लाकडी दांड्याने हल्ला केल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. अंबड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत. संशयितांना ताब्यात घेतले व जखमीला रुग्णालयात दाखल केले. चौकशीत त्याने सागर नाव सांगितले. त्याचा जबाब घेतला असता युवतीच्या भावाला
प्रेमसंबंधाची भनक लागल्याने त्याने हल्ला केल्याची माहिती दिली. मात्र तिच्याकरता मरण पत्करेन, असे सांगत युवतीच्या भावाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला. पोलिसांनी तरुणावर अधिक दबाव न टाकता स्वतः फिर्यादी होत गुरवनामक तरुणासह त्याच्या चार अल्पवयीन मित्रांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगत हल्ला करुन दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. सिडको परिसरात पोलिस गस्त होत नसल्याने गुन्हेगारी वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला.
