हनुमान जयंतीनिमित्त सिडकोत विविध कार्यक्रमांचे आयोजन
सिडको
प्रतिनिधी
परिसरातील जिव्हाळा संकुल नजीक असलेल्या हनुमान चौक मित्रमंडळ गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे.
सुरुवातीला लहान स्वरूपात असलेले येथील हनुमान मंदिर आणि सभागृह आता भव्य रूपात उभे असून, दरवर्षी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात.
या वर्षी हनुमान जयंती शनिवार, ( दि. १२) असल्यामुळे उत्सवाची तयारी अधिक भव्य स्वरूपात करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली असून,
परिसरात साफसफाई आणि विद्युत रोषणाई केली गेली आहे.
उत्सवाच्या दिवशी सकाळी हनुमान जयंतीनिमित्त महाअभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर विशेष आरती होणार असून, दिवसभर भाविकांसाठी प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
विशेष जयंतीच्या म्हणजे, दुसऱ्या हनुमान दिवशी म्हणजेच रविवार, १३ एप्रिल रोजी संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक, भक्तगण आणि मंडळाचे सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन हनुमान चौक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
