कोयता घेऊन फिरणारा टवाळखोर जेरबंद
इंदिरा नगर प्रतिनिधी:,
इंदिरानगर परिसरातील देवरामनगर येथे धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरणाऱ्या एका टवाळखोराला गुन्हे शोध पथकाने कोयत्यासह जेरबंद केले.
मंगळवारी (दि.८) पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून देवरामनगर, ढेमसे मळा, जुनी
पोलीस कॉलनी परिसरात एकजण धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पवन परदेशी, सौरभ माळी, अमोल कोथमिरे यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सागर महेंद्र शिंदे (वय २०, रा. एकता ग्रीन,
अमृतानगर, पाथर्डी फाटा, नाशिक) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १००/- रुपये किमतीचा धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार कुलदीप पवार करीत आहेत.
