चोरट्यांनी घरफोडी करत ८९००० रुपये किमतीचा मुद्देमाल केला लंपास..
सिडको प्रतिनिधी:,
इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील पाथर्डी फाटा दामोदर नगर पांडुरंग चौक या ठिकाणी चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घराच्या आत प्रवेश करत ८९००० किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप प्रकाश जाधव राहणार दामोदर नगर पांडुरंग चौक हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते चोरट्यांनी ही संधी साधत जाधव यांच्या घरातील लोखंडी कपाटातील लॉकर तोडून ३४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र १७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे मनी १२५०० रुपये किमतीचे सोन्याचे कर्णफुल चांदीचे जोडवे तसेच काही चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत ..
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुंदे यांच्या मार्गदर्शना खाली पो हा शेख करत आहेत..
