पांडवलेणी डोंगरावर अडकलेल्या पिता-पुत्राची तीन तासानंतर सुटका...!
इंदिरानगर प्रतिनिधी:,
पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग साठी गेलेले पिता पुत्र अडकल्याने त्यांना तब्बल दोन ते तीन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे.
याबाबत अग्निशमन विभाग तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक मधील एडवोकेट उमेश वालझाडे तसेच त्यांचा 14 वर्षाचा मुलगा तेजस वालझाडे हे दोघेही रविवार असल्याने पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग साठी गेले होते.
यानंतर डोंगरावरून खाली उतरण्याचा अंदाज येत नसल्याने ते घाबरले.
दरम्यान डोंगरावर आम्ही अडकलो, असल्याची माहिती त्यांनी इंदिरानगर पोलिसांना दिली पोलिसांनी ही घटनेची माहिती अग्निशमन विभाग तसेच रेस्क्यू टीमला दिल्यानंतर सकाळी ९ : ३० वाजेच्या सुमारास पांडवलेणी डोंगरावर अडकलेल्या पिता-पुत्रांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.
गिर्यारोहक टीम तसेच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोर व अन्य साहित्याच्या मदतीने संबंधित पिता पुत्रांना सुखरूप खाली उतरवले. सदरची कामगिरी इंदिरानगर पोलीस गिर्यारोहक टीम तसेच सिडको अग्निशमन विभागाचे लीडिंग फायरमन अर्शद पटेल, श्रीराम देशमुख, वाहन चालक मल्हारी आहे रे तेजस वाघ, पार्थ शिंदे, सुमित कोठे, मीयोद्दीन शेख आदींनी केली आहे.
