Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

पोलीस महासंचालक पदक जाहीर

पोलीस महासंचालक पदक जाहीर

नाशिक:, नितिन चव्हाण


 महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदारांना सेवा काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली.

 आहेत यात नाशिक शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह आयुक्तलयातील २९ तर नाशिक ग्रामीण मधील १७ अधिकारी अंमलदारांना राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही पदके जाहीर केली आहेत.

 पोलीस उप महानिरीक्षक, सह आयुक्त, पोलीस अधीक्षक ते अंमलदार प्रवर्गापर्यंत राज्यातील एकूण ८०० पोलिसांना हे सन्मानचिन्ह जाहीर केले आहे.

 यात वरील अधिकाऱ्यांसह नाशिक पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की, म्हसरूळ  पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, चुंचाळे  चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे, यांचा देखील समावेश आहे.


----------------

 नाशिक शहर

 उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत जाधव, नितीन धोंडगे, हवालदार नाझीम खान पठाण, देविदास ठाकरे, प्रवीण पगारे, अतुल पाटील, राजेंद्र सांगळे, धनंजय शिंदे,अरविंद उगले, घनश्याम पाटील, संतोष निकम,आनंदा चौधरी, सुधाकर गायकवाड, मुकुंद महाजन, अविनाश देवरे, श्वान पथकातील गणेश कोंडे,चंद्रकांत जगदाळे, गायत्री गोसावी, विजय वरंधळ, संतोष काळे, किरण अहिरराव, प्रशांत मरकड..


-----------------

 नाशिक ग्रामीण 

 सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक रजीक शेख, सहाय्यक उपनिरीक्षक हरून शेख, हवालदार भगीरथ भडांगे,शरद कडलक, नंदू वाघ प्रवीण वनवे कृष्णा माळोदे, जालिंदर खरोटे, प्रशांत पाटील, विजय बिलघे, हेमंत किलबिले, पोलीस नाईक सुशांत मरकड, श्रीकांत देशमुख, संकेत कासार,व महाराष्ट्र पोलीस अकादमीतील हवालदार प्रदीप वाघमारे,राजू दोरकर, सुनील कोकणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.