धारदार चॉपर व दुचाकी वाहनासह इसमाला अंबड मध्ये अटक:,
सिडको प्रतिनिधी:,
अंबड परिसरात शस्त्रबंदी आदेश असतानाही धारदार चॉपर बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून शस्त्रासह मोपेड वाहनही जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अंबड पोलिसांनी दिनांक १४ एप्रिल सायंकाळी केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेश अंकुश डोंगरे (वय चाळीस वर्षे, रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक) असे आहे. घरकुल योजना परिसरात तो संशयितरित्या फिरत असताना एमआयडीसी चुंचाळे पोलिस चौकीचे पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर यांनी त्याला थांबवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान आरोपीकडे एक धारदार लोखंडी चॉपर आढळून आला. तसेच आरोपीकडे वीस हजार रुपये किमतीची हिरो डेस्टिनी मोपेड देखील आढळून आली.
याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.
