उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंबड पोलिसांचा सत्कार:,
सिडको:, नितिन चव्हाण
अंबड पोलिसांनी मॅफेड्राेन व गावठी कट्टा हस्तगत करत तिघा संशयितांना सापळा रचून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता त्यांच्या या कामगिरीबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अभिनंदन करत प्रशस्ती पत्रक व ३० हजार रुपयांचा रिवार्ड मंजूर केला.
यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस राकेश हांडे, अंमलदार सचिन करंजे, अनिल गाढवे,राहुल जगझाप,सागर जाधव,मयूर पवार,प्रवीण राठोड,घनशाम भोये,दीपक निकम,संदीप डावरे,समाधान शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला.
