नाशिक मध्ये हॉटेल व्यवसायिकाची अपहरण:,पार्टनर कडून घेतली १५ लाखांची खंडणी
सिडको प्रतिनिधी:,
नाशिक मध्ये हॉटेल व्यवसायिकाच्या अपहरणाची घटना घडली आहे.. हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण करून पार्टनर कडून पंधरा लाखांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे..
निखिल दर्यानाणी असे अपहरण झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे.. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत हॉटेल व्यवसायिक निखिलचे त्याच्याच गाडीत अपहरण करण्यात आले..
ही संपूर्ण घटना नाशिकच्या काटे गल्ली सिग्नल जवळ घडली आहे.. स्वतः निखिल अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका करून पळाला त्यामुळे निखिलचा जीव वाचल्याचे बोलले जात आहे..
हॉटेल व्यवसायिक निखिलच्या अपहरणानंतर चार चाकी कार घेऊन पाळलेल्या इस्मानी दादासाहेब फाळके स्मारक जवळ त्याची कार सोडून पलायन केले या संपूर्ण घटने प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
नेमकं निखिलचे अपहरण का केले काय प्रकरण आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे...
