पांडवलेणीच्या पायथ्याशी आलिशान कार जळून खाक
सिडको प्रतिनिधी:,
विपुलकुमार प्रफुलचंद्र शाह (वय ५३, रा. मूळ. बडोदरा गुजरात) हे कामानिमित्त नाशिक येथे आले होते. दरम्यान त्यांच्या मालकीची टाटा कंपनीची हेरियर कार क्रमांक (GJ.06.PH.9136) हे घेऊन फाळके स्मारक पांडवलेणीच्या पायथ्याशी आले होते. यावेळी कार मध्ये काहीतरी जळाल्याचा वास येऊ लागल्याने विपुल कुमार शहा हे व त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर हे दोघेही कारच्या बाहेर उतरले.
दरम्यान कारचे बोनेट कोरले असता यावेळी मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. काही मिनिटातच यावेळी मोठ्या प्रमाणात आग निघू लागल्याने त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात आग भडकली. दरम्यान अग्निशमन विभागाशी संपर्क साधला मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर त्यांची आली शानकार पूर्णतः जळून खाक झाली होती.
शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. अग्निशमन विभागाने येऊन या ठिकाणी आग विझवली. दरम्यान बाजूला असलेले झाडही या आगीने जळून खाक झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी जीवित हानी टळली.
