सीनियर पीआय सोबत वाद घालणे पडले महागात...
हवालदाराचे निलंबन...
नाशिक प्रतिनिधी:,
गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवलदाराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकास दम भरून पाहून घेण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान या प्रकरणी संशयित हवलदार विजय सुखदेव जाधव यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे त्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्तांच्या आदेशाने उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढले आहेत स्ट्राइकिंग तयार करून बंदोबस्ताच्या अनुषंगाने गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुक्रवारी सकाळी 11 वाजता सर्व अंमलदारांना सूचना देत होते तेव्हा जाधव यांना बोलविण्यात आले.
असता ते गणवेशाविना खाजगी गणवेशात हजर झाले त्याबाबत निरीक्षकांनी विचारणा केली असता त्यांनी अरेरावे करून ''तुझ्या नावाने राजीनामा देतो, तुला कामाला लावतो, असे एकेरी शब्द वापरले दरम्यान जाधव यांनी वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये जाऊन ''तुला माझ्या ड्रेसची काय पडले?'' मला रिक्रुट समजतो का? मीच तुला कामाला लावतो राजीनामा देतो तू भगत असे एकेरी शब्द वापरून वरिष्ठ निरीक्षकांच्या अंगावर धावून जाण्याची कृती केली आहे.
ही संपूर्ण घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे...
------------------------------------
जाधव यांचा नेहमीच गणवेशाला नाकार
जाधव हे कर्तव्यासाठी येताना नेहमी साध्या व खाजगी गणवेशात येत असल्याने वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी वेळोवेळी समज दिली होती तरी देखील सुधारणा झाली नाही त्यामुळे जाणीवपूर्वक खाजगी गणवेशात येऊन शिस्तभंग करत असल्याचे निदर्शनात आले हे वर्तन पोलीस खात्याच्या शिस्तीस नो शोभणारे बेशिस्त व बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचे असल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नियम क्र २५ अन्वये विजय जाधव यांना चौकशीच्या अधीन राहून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे
