चोरट्यांनी घरफोडी करत २५ हजारांचा ऐवज केला लंपास:,
सिडको प्रतिनिधी:
अंबड परिसरात असलेल्या गोदावरी नगर, चुंचाळे शिवार येथे घरफोडीची एक घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ₹२५,००० किमतीचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय रामचंद्र शिरसाठ (वय ४८, रा. गोदावरी नगर, अंबड लिंक रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना दि. १५ एप्रिल रोजी रात्री ११:३० ते १६ एप्रिल रोजी सकाळी ६: या वेळेत घडली. फिर्यादी यांच्या अनुपस्थितीत अज्ञात इसमाने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व किचनमधील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.
चोरट्यांनी चोरून नेलेला ऐवज पुढीलप्रमाणे आहे: ₹५,००० रोख रक्कम (१००, २०० व ५०० रुपयांच्या नोटा), ₹१२,००० किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र (पेंडंटसह), आणि ₹८,०००किमतीची एक सोन्याची नथ. या एकूण ऐवजाची किंमत २५,०००इतकी आहे.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे
