विवाहितेच्या छळाप्रकरणी तीन जणांविरुद्ध अंबड पोलीस ठण्यात गुन्हा दाखवल:,
सिडको प्रतिनिधी:,
स्वयंपाक येत नाही, घरकाम जमत नाही, आणि लग्नात मानपान दिला नाही या कारणांवरून सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ झाल्याची तक्रार एका विवाहितेने केली असून, पुणे येथील चहोली बु. (ता. हवेली) येथे राहणाऱ्या सासरच्या दोघा पुरुष व एका महिलेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १ जून २०१८ ते ३० जून २०२४ या काळात तिचा सासरी सतत छळ करण्यात आला. “तुला स्वयंपाक येत नाही, घरकाम जमत नाही, तुझ्या आईवडिलांकडून लग्नात काही दिलं नाही, आम्हाला कर्ज फेडण्यासाठी पैसे आण”, अशा कारणांवरून वारंवार शिवीगाळ, दमदाटी, मारहाण व शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला गेला. इतकेच नव्हे तर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही काढून घेत तिला घराबाहेर काढण्यात आले, असे फिर्यादीने सांगितले.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे वपोनि राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाकडून अधिक तपास केला जात आहे.
