उंटवाडीचा राजा अतीप्राचीन श्री म्हसोबा महाराज यात्रा नियोजन बैठक संपन्न...
सिडको प्रतिनिधी :,
नदीच्या तिरावर असलेल्या आणि गर्द हिरव्या महाकाय वटवृक्षाच्या छायेत स्वयंभू उंटवाडीचा राजा अतिप्राचीन म्हसोबा महाराजांची दोन दिवशीय यात्रेनीमित्त यात्रा उत्सव पंच कमिटीची बैठक देवस्थान समितीचे अध्यक्ष फकिरराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याबैठकीत दिनांक २६आणि २७एप्रिल २०२५ रोजी यात्राोत्सव साजरा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला
श्री म्हसोबा महाराज देवस्थान समितीच्या माध्यमातुन पुर्वापार चालत असलेली यात्रेची परंपरा आजतागायत जोपासली जात आहे या ठिकाणी होणा-या यात्रेमध्ये उंटवाडीसह मोरवाडी,अंबड,पाथर्डी,वडनेर ,सातपुर पिंपळगाव खांब, गौळाणे ,दाढेगाव आदी भागातुन पुर्वीच्याकाळात बैलगाडीतुन भाविक यात्रेसाठी येत होते मात्र काळानुसार बदल झाला असला तरी यात्रोत्सव पूर्वीसारखाच आजही कायम आहे
यात्रा, ऊरुस म्हटला की तमाशा, वग, ऑर्केस्ट्रा, यासह रंगारंग कार्यक्रमांची यात्रेकरुंसाठी जणु बहारदार मेजवानीच असते परंतु अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा उत्सव पंच कमेटीने या सर्व बाबींना फाटा देत यात्रोत्सवात सहभागी होणार्या यात्रेकरुंसाठी सध्या बहुचर्चित असलेला छावा चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेतला
त्याचप्रमाणे यात्रेच्या समाप्तीनिमित्त अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने कुस्त्यांची दंगल भरविण्याची परंपरा कायम ठेवत यंदाही कुस्तीप्रेमींसाठी अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने दिनांक २७ एप्रिल रोजी सिटी सेंटर मॉल नजीक महाकाय आणि विशाल वटवृक्षाच्या छायेखाली अतिप्राचीन म्हसोबा महाराज मंदिरच्या प्रांगणात कुस्त्यांची दंगल भरविण्याचा निर्णयही याबैठकीत घेण्यात आला यावेळी अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीचे अध्यक्ष फकिरराव तिडके,माजी अध्यक्ष मधुकर तिडके यांच्यासह सदाशिव नाईक, अंबादास जगताप, रामचंद्र तिडके ,बाजीराव तिडके,आण्णा पाटील,दत्ता पाटील मनोहर तिडके विलास जगताप, संदिप जगताप, एकनाथ तिडके, जगन्नाथ तिडके, राजेश गाढवे, सुरेश जगताप, बाळासाहेब तिडके, ,प्रविण जगताप , आदी उपस्थित होते
