पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाची मध्यरात्रीपासून दरवाढ..
पिंपळगाव प्रतिनिधी:,
कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे सतत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाचे दर आज मध्यरात्रीपासून वाढणार आहे. नवीन आर्थिक वर्ष म्हणजे १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होत असते.
आज मध्यरात्रीपासून सुरू झालेली दरवाढ ही प्रत्येक वाहनामागे सरासरी १० ते ५० रुपयांपर्यंत आहे. अगोदरच न परडवणाऱ्या पथकरात अजून भर पडणार असल्याने
वाहनधारकांसाठी 'दुष्काळात तेरावा महिना' ठरणार आहे.
सतरा वर्षांपूर्वी पिंपळगाव बसवंतचा टोलनाका अस्तित्वात
आला.
दरवर्षी येथे पथकरात वाढ होते, टोलनाका परिसरात
सुविधांची मात्र बोंबाबोंब आहे. पूर्ण लेन कार्यान्वित राहत नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात हे मनस्ताप देणारे चित्र नेहमीच बघायला मिळते.
आज एक एप्रिल मध्यरात्री बारा वाजेपासून पुन्हा टोलवाड करून वाहनधारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे ही दरवाढ ना मात्र वाटत असली तरी रोज पथकर संकलनात दीड ते दोन लाख रुपयांची वाढ होणार आहे.
