अंबडमध्ये हॉटेलसमोर सिगारेटच्या पैशांवरून हाणामारी – चार जणांविरोधात गुन्हा दाखल
सिडको प्रतिनिधी :,
अंबड परिसरातील हॉटेल महाराजाच्या बाहेर सिगारेट व लाईटरच्या पैशांवरून वाद निर्माण होऊन झालेल्या हाणामारीत एका तरुणास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. हॉटेल मालक, मॅनेजर, वॉचमन व टपरी चालक यांनी संगनमताने ही मारहाण केल्याची फिर्याद अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ही दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११:३० वाजता घडली. फिर्यादी अक्षय मधुकर पवार (वय २५, रा. दत्त नगर, अंबड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिगारेट व लाईटरच्या पैशांवरून वाद निर्माण झाल्यानंतर हॉटेल मालक सुर्या महापात्रो याने "तू जास्त भाई झाला का?" असे म्हणत, फिर्यादीच्या चारचाकी वाहनातील जॅक पाना काढून त्यांच्या हातावर व पाठीवर मारहाण केली.
यावेळी त्यांचे मित्र सर्जेराव मोरे, वैदांत रोकडे व बाळू मोरे हे सोबत होते. त्यांनाही हॉटेल मॅनेजर, वॉचमन व टपरी चालक यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत सर्वांना दुखापत झाली असून, फिर्यादीस गंभीर जखम झाली आहे.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलिस निरिक्षक मनोहर कारंडे कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत पुढील कारवाई सुरू आहे.
