व्हाईट टॉपिंग रस्ता म्हणजे काय..?
प्रभाग २४ मध्ये साकारणार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हाईट टॉपिंग रस्ता...
सिडको नितिन चव्हाण:,
प्रभाग क्रमांक २४ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते..
परंतु ही बाब लक्षात घेता प्रभागाचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी निधी मंजूर करत पाच दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करत कामाला सुरुवात केली...
विशेष म्हणजे हा रस्ता साधासुधा नव्हे तर व्हाईट टॉपिंग पद्धतीने तयार करण्यात येणार आहे....
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आतापर्यंत डांबरी रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण चा रस्ता एकला होता परंतु व्हाईट टॉपिंग म्हणजे काय.....?
व्हाईट टायपिंग रस्ता म्हणजे पारंपारिक डांबरी रस्त्याच्या जागी सिमेंटचा व्हाईट टॉपिंग वापरणे यामध्ये डांबरी रस्ता काढून टाकून त्यावर सिमेंट काँक्रिटीचा थर लावणे समाविष्ट आहे.यालाच व्हाईट टॉपिंग रस्ता म्हणतात...
उदाहरणार्थ -------------
काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
सारखे विभाग व्हाईट टॉपिंग तंत्रज्ञान वापरतात
---------------------
व्हाईट टॉपिंग चे फायदे
खड्डे कमी व्हाईट टॉपिंग मुळे सिमेंट काँक्रीट चा रस्ता तयार होतो ज्यामुळे खड्डे पडण्याची शक्यता कमी असते हा रस्ता दीर्घकाळ टिकणारा असतो सिमेंट काँक्रीट चा रस्ता डांबरी रस्त्यापेक्षा अधिक टिकाऊ असतो याला कमी खर्च लागतो.
सिमेंटचा रस्ता डांबरी रस्त्याच्या तुलनेत कमी खर्चात बनतो आणि त्याची देखभाल खर्चही कमी असते हा रस्ता पर्यावरण पूरक ही असतो सिमेंट काँक्रेट चा वापर डांबरापेक्षा अधिक पर्यावरण पूरक मानला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2014 पासून बंगळूरु शहरात या व्हाईट टायपिंग रस्त्याची सुरुवात झाली त्यामुळे अपघातही कमी होऊ लागले.
खड्ड्यांच्या समस्या देखील कमी झाल्या.... या रस्त्याच्या निष्कर्षात व्हाईट टॉपिंग रस्ता हा एक आधुनिक तंत्रज्ञान आहे.
जो डांबरी रस्त्याच्या तुलनेत अधिक टिकाऊ आणि कमी खर्चात बनतो.... नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक २४ मध्ये पहिल्यांदाच व्हाईट टॉपिंग रस्ता तयार होत असल्याने नागरिकांसाठी ही बाब विशेष ठरणार आहे....
