विविध गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेला ८५ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द
सिडको प्रतिनिधी:,
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेले दुचाकी वाहने, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन, तसेच रोकड रक्कम असा ऐकून 85 लाखांचा मुद्देमाल तक्रारदांच्या हाती मूळ मालकांना पोलिसांनी हस्तांतरण केला आहे.
इंदिरानगर येथील आदित्य हॉल येथे मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सचिन बारी तसेच सहाही पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या सहाही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी, चोरी, सोनसाखळी चोरी, दुचाकीचोरी, मोबाईल चोरी, यासह अन्य या घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये तक्रारदार फिर्यादींनी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शकल लढून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला.
एकूण ६० फिर्यादींना एकूण ८३ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल मूळ मालक फिर्यादींना हस्तांतरित करण्यात आला आहे. मुद्देमाल परत मिळाल्यानंतर फिर्यादी महिला भगिनींनी मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांना आपल्या सौभाग्याचे लेणे मिळाल्यामुळे अश्रू अनावर झाले.
यावेळी पोलिसांची तत्परता अन डायल 112 वर कॉल केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद याबाबत उपस्थिती त्यांनी कौतुक केले.
