जुने सिडकोत ३० एप्रिल पासून साई महोत्सव
सिडको नितिन चव्हाण
जुने सिडको येथील श्री साईनाथ मंदिरात यंदाही साई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराचा १४ वा वर्धापन दिन बुधवारी (ता. ३०) सायंकाळी ५ वाजता साजरा होणार असून, यानिमित्त श्री साई पालखी मिरवणूक व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री साई पालखी, सटाणा ढोलपथक, साऊथ इंडियन ढोलपथक, कथकली पथक, नरसिंह, गरुड सप्तशृंगी देवी, महाकाली, महादेव, महाबली हनुमान यांची चलचित्र, आदिवासी नृत्य, राष्ट्रीय मर्दानी युद्धकला पथक, फनकार बँड, ओएसओ साउंड सिस्टीम, तुतारी, भालेदार, चोपदार, लाइट छत्री, लेझर शो, क्लोन स्टार पथक, तुलसीधारी महिला आणि विविध रंगी आतषबाजी आदींचा मिरवणुकीत समावेश असणार आहे. शोभायात्रेत प्रभागातील ज्येष्ठ
नागरिक संघ, महिला हास्य क्लब, भजनी मंडळातील महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १ मेस सायंकाळी पाचपासून, सर्व भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ओम साईनाथ ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी साईभक्तांना महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

