कंडक्टरच्या तिकीट मशीनवर चोरट्यांचा डल्ला.... राणे नगर परिसरातील घटना
सिडको :,
प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवीत असताना कंडक्टरची तिकीट मशीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना महामार्गावरील राणेनगर भागात घडली.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर बबन नागरे (रा. हनुमान चौक सिडको ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे नागरे एस.टी महामंडळात वाहक पदावर कार्यरत असून ते शिवशाही बस वर सेवा बजावत असताना ही घटना घडली. इगतपुरीच्या दिशेने निघालेली शिवशाही बस उड्डाणपूलावरील जात असताना साई पॅलेस हॉटेल समोर बंद पडल्याने ही घटना घडली.
बसमधील प्रवाशांना अन्य वाहनातून मार्गस्थ करीत असताना अज्ञात चोरट्यांनी वाहक असनावर ठेवलेले सुमारे ४० हजार रुपये किमतीचे तिकीट काढण्याचे इलेक्ट्रिक मशीन चोरून नेले याप्रकरणी अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत
