Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सिडकोत संत गोरा कुंभार पुण्यतिथी संपन्न

सिडकोत संत गोरा कुंभार पुण्यतिथी संपन्न

सिडको प्रतिनिधी:,

 


संत शिरोमणी गोरोबाकाका समुपदेशन केंद्र व अर्जुन प्रभात शाखेच्यावतीने संत गोराकुंभार पुण्यतिथी बडदे हॉल , जुने सिडको येथे उत्साहात संपन्न झाली .

प्रारंभी संयोजक प्रा . वसंत चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषण करून संत गोरा कुंभार यांच्या जीवनावरील स्वरचित कविता सादर केल्या . 

विशेष अतिथी शिवसेना महानगर प्रमुख प्रविण ( बंटी ) तिदमे यांच्या हस्ते संत गोरा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

 याप्रसंगी तिदमे यांनी संत गोरा कुंभार यांच्या भक्तिमार्गावर मार्गदर्शन केले . प्रा . चव्हाण व सौ . चव्हाण यांच्या हस्ते तिदमे व मान्यवरांना गोरोबाकाकांनी मानवाला दिलेलं दान म्हणजे मडकं , लाकडी फलाटी व दगडी गुंडी भेट देऊन सत्कार केला . 

कुंभार समाज बांधवांसह सर्व उपस्थितांना संत गोरा कुंभार हे सावळीराम तिदमे लिखित पुस्तक भेट देण्यात आले .


 श्री कृष्णराव बेदडे यांनी स्वागत केले . अविनाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले . प्रकाश काळे यांनी आभार मानले . नारायण सोनवणे , प्रकाश चित्ते , सुरेश ढोबळे , प्रमिला शिंदे , अनिल मोरे , रंजना मोरे , पुंडलिक सोनवणे , लक्ष्मीकांत शिन्दे , शरद जाखडे व पंडितराव पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.