Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कलेक्शनच्या वर्चस्ववादातून... पोलीस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

कलेक्शनच्या वर्चस्ववादातून... पोलीस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी


 नाशिक प्रतिनिधी,

सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कलेक्शनच्या वर्चस्वावरून चांगलीच धूम शक्री उडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे वादग्रस्त राजपूत आणि गोपनीय शाखेतील कर्मचारी पाटील यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर थेट हाणामारी झाली.

 या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेतील शिस्त व कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सरकार वाडा पोलीस ठाण्यात राजपूत आणि पाटील यांच्यात वाद झाला सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली मात्र काही क्षणातच हा वाद हातघाईवर गेला दोघांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली कपडे फाडले आणि संपूर्ण पोलीस ठाण्यात गोंधळ उडवून दिला.

 घटनेची माहिती मिळताच इतर कर्मचारी घटनास्थळी धावून आले व त्यांना वेगळे केले या प्रकरणात प्रभारी अधिकारी तातडीने ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित दोघांना समज दिली मात्र वाद इतका पेटला होता की वरिष्ठांसमोरही त्यांनी एकमेकांवर आरोप करत भाष्य केले अखेर शांतता राखण्यासाठी दोघांनाही घरी पाठवण्यात आले.

शहरात गुन्हेगारी वाढत असताना पोलीस ठाण्यातच अशा घटना घडणे हे नागरिकांच्या सुरक्षेचा दृष्टीने गंभीर मानले जात आहे या घटनेमुळे कलेक्शनच्या वर्चस्वावरून पोलीस ठाण्यात अंतर्गत कुरबुरी असल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस आयुक्त कर्णिक या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


 सुभेदारी मिळवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ 

 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्यरित्या धंद्यांना परवानगी देणे किंवा चालू धंदा बंद करणे यांसह विविध अवैद्यरित्या सुरू असलेल्या धंदे चालकांकडून वसुली अर्थात कलेक्शन करण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यात कलेक्टर म्हणजे सुभेदार असतो आणि ही सुभेदारी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांकडे दिली जाते ही सुभेदारी मिळवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ लागते यातच पूर्वीचा सुभेदार किंवा कलेक्शन करतो त्यापेक्षा डबल कलेक्शन देऊ असे सुद्धा सांगितले जाते आणि हीच सुभेदारी मिळवण्यासाठी दोन कलेक्टर अर्थात सुभेदारांमध्ये वाद झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात चांगलीच रंगली होती..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.