सिडको प्रतिनिधी :,
चार ते पाच जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या कुरापतीतून एका १९ वर्षीय युवकावर कोयत्याने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना दामोदर चौकातील नरहरी लॉन्स समोर घडली आहे.
रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. जखमी रितेश लाटे यास स्थानिक नागरिकांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश लाटे (वय 19 स्वराज्यनगर पाथर्डी) असे गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळतात इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलिसांचा फौजा फाटा घटनास्थळी दाखल झाला. मारहाण करणाऱ्या संशयतांची काही नावे पोलिसांना समजले असून पोलिसांची विविध पथके संशयीतांच्या मागावर रवाना करण्यात आली आहे. जुन्या वादाच्या कुरापतीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
---------------
घटनास्थळी जखमेच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून प्राण घातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
