नाशिक प्रतिनिधी:,
मागील आठवड्यात एका माथे फिरूने हैप्पी होली म्हणत गहलोत नामक सफाई कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोलने भरलेली पिशवी अंगावर फेकून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या ठक्कर बस स्थानकावर घडला होता..
त्या माथेफिरूला युनिट एकच्या पथकाने तासाभरातच ताब्यात घेतले होते...
सफाई कर्मचारी गेहलोत यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते
गेहलोत हे काही दिवसांपासून उपचार घेत असताना आज मात्र त्यांचा मृत्यू झाला... ठक्कर बस स्थानकावर मद्यपी टवाळखोर यांचा वावर वाढल्याने अशा घटना घडत असल्याचे बोललेले जात आहे... संशयित आरोपीवर कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
