सिडको प्रतिनिधी:,
जुने सिडको परिसरातील अचानक चौक महाराणा प्रताप चौक बडदे नगर यासह विविध भागात एन सणासुदीच्या दिवशी दुपारी दोन वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत तब्बल चार ते पाच तास विजेचा लपंडाव सुरू असल्याने या ठिकाणच्या व्यवसायिकांसह हजारो नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
एकीकडे उन्हाचा तडाखा सुरू असताना दुसरीकडे दिवसाढवळ्या तसेच सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
जुने सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी चौक येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर झाडाची फांदी पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. यामुळे सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया
नागरिकांनी व्यक्त करण्यात आल्या.

