सिडको प्रतिनिधी:,
पोलीस ठाणे हद्दीतील अवैध सावकारी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोक्का कायदा लागू केला आहे.या टोळीचा प्रमुख तथा अवैध सावकारी करणारा खाजगी सावकार वैभव देवरे आणि त्याच्यासह त्याची पत्नी सोनल देवरे, मेहुणा निखिल पवार तसेच साथीदार गोविंद ससाणे, यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
पोलिसांनी केलेल्या मोक्का कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईमुळे अनेक खाजगी आणि बेकायदेशीररीत्या खाजगी सावकारी करणा-यांचे धाबे दणाणले आहे दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
याबाबत अधिक माहिती अशी की अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात, टोळी प्रमुख वैभव देवरे आणि त्याच्या साथीदारांनी संशयास्पद पद्धतीने जमीनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून नागरिकांना फसवले. त्याने इतरांच्या जमिनींचा व्यवहार केलेला असताना फिर्यादीसोबत दुहेरी व्यवहार करून ३,०५,०००००/- रुपयांत जमीनीचा व्यवहार केला. मात्र, पैसे घेऊनही कोणतीही जमीन फिर्यादीच्या नावावर न करता, आरोपींनी पैसे परत करण्यास टाळाटाळ केली.तसेच, आरोपी वैभव देवरे याने सावकारी व्यवसायासाठी फिर्यादीकडून ३५ लाख रुपये बळजबरीने घेतले. पैसे मागितल्यावर आरोपींनी फिर्यादीला विनयभंगाची खोटी तक्रार करण्याची धमकी दिली, तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या सर्व कृत्यांमुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर कारवाई केली आहे.
अंबड पोलिस ठाण्याच्या तपासानुसार, या गुन्ह्यात टोळी प्रमुख वैभव देवरे आणि त्याचे साथीदार गोविंद ससाणे, सोनल देवरे आणि निखील पवार यांनी संयुक्तपणे समाजात दहशत निर्माण केली होती. या टोळीने नाशिक शहरातील इंदिरानगर, अंबड, गंगापुर, मुंबईनाका परिसरात लोकांची आर्थिक फसवणूक केली, त्यांना अवैध सावकारी करून त्यांच्याकडून अवाजवी व्याज वसूल केले, तसेच धमक्या देऊन पैसे वसूल केले.आरोपींनी एकत्र येऊन अनेक अवैध सावकारी कृत्ये केली आहेत. यामुळे नाशिक शहरात या टोळीच्या कारवायांचा मोठा वचक निर्माण झाला आहे. इंदिरानगर, अंबड, गंगापुर, मुंबईनाका पोलिस ठाण्यांत एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यात आरोपींनी या अवैध कृत्यांना चालना दिली.गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ (मोक्का) कलम ३(१)(ए), ३(२), ३(४), ३(५) अंतर्गत आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
---------------------------
पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांचे नागरिकांना आवाहन
प्रतिक्रिया
आयुक्तालय हद्दीत जर कुणी अवैधरीत्या खाजगी सावकारी करत असतील अशा खाजगी सावकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील अवैध सावकारी करणारे व्यक्ती किंवा टोळ्या आढळल्यास त्याबद्दल पोलिसांना त्वरित माहिती दिली जावी. यापुढे अशा प्रकारच्या अवैध सावकारी कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
संदिप कर्णिक
पोलिस आयुक्त
नाशिक शहर नाशिक
