नाशिक - प्रतिनिधी
पाथर्डी विल्होळी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या
दि.19 रोजी सकाळच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात जेरबंद झाला. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरीही बिबट्याची भीती कायम आहे. विल्होळी,पाथर्डी,गौळाने परिसरात गेल्या अनेक दिवसापासून हा बिबट्या वस्तीवर मळ्यात तसेच गावात धुमाकूळ घालत होता. जनावरे फस्त करत होता.
ग्रामस्थांना सायंकाळी दार बंद करूनच घरातच बसून राहावे लागत होते. यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले होते. वनविभागा कडून वारंवार मागणी करून कुठलीही कारवाई होत नव्हती परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्याला बिबटय़ा याच भागात असल्याचे कळवताच त्यांनी दखल घेऊन तात्काळ पिंजरा लावला.
याच पिंजऱ्यात बिबट्या सकाळी बंद झाला यामुळे गावकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला असून पिंजरा कायमचा येथेच ठेवावा आशी मागणी शांताराम चुंबळे,माजी नगरसेवक सुदाम ढेमसे भगवान दोंदे सोमनाथ बोराडे आदींनी केली आहे.
